Running Benefits To Reduce Belly Fat And Tips For Weight Loss ; पोटाची चरबी लटकत असेल तर वापरा धावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या धावण्याचे फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धावण्याची योग्य पद्धत

धावण्याची योग्य पद्धत

धावण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य माहिती नसताना धावणे हे तुमच्या जीवावर बेतू शकते. कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी जाणून घ्या योग्य टिप्स

  • धावण्यापूर्वी काही दिवस तुम्ही थोडं अधिक चाला. यादरम्यान काही शारीरिक त्रास होत असेल तर डॉक्टरांना संपर्क करा. तसंच रनिंग शूज घालूनच धावा
  • धावण्यापूर्वी तुम्ही योग्य मार्गाची निवड करा. रेतीच्या अथवा जास्त उतार चढाव असणारा रस्ता धावण्यासाठी निवडू नकासुरूवातीला कधीही जोरात धाऊ नका. आधी धीम्या गतीने चालू करून मग तुमच्या धावण्याचा स्पीड वाढवा
  • धावण्यापूर्वी ५ मिनिट्स Warm Up करा. यामध्ये काही अंतरापर्यंत चालणे, एका जागी मार्च करणे समाविष्ट असून यामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर अनावश्यक ताण येत नाही हे लक्षात घ्या
  • सकाळी उन्हापूर्वी आणि संध्याकाळी ५-६ वाजता तुम्ही धावू शकता. तसंच किती किलोमीटर धावत आहात याची नेहमी नोंद ठेवा. रस्त्याच्या मधोमध कधीही धावणे योग्य नाही

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी धावण्याचे फायदे होतात. एका अभ्यासानुसार, धावणे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी घटविण्यासह वजन नियंत्रित करण्यासही मदत करतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी धावणे हा व्यायाम उपयुक्त ठरतो.कारण Body Mass Index वर याचे चांगले काम होते. रोज धावल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळतो.

(वाचा – ​युरिक अ‍ॅसिड शरीरातून नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतो किचनमधील काळ पदार्थ, करा घरगुती उपाय)

हृदय निरोगी राहण्यासाठी

हृदय निरोगी राहण्यासाठी

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, नियमित स्वरूपात धावण्याने हृदयाला फायदा मिळतो. एका अहवालानुसार, रक्तातील धमन्यांना अर्थात Cardiovascular Fitness योग्य राखण्यासाठी याचा वापर करून घेता येतो.

हेल्द रिपोर्टनुसार, धावण्याने शरीरातील ऊर्जा आणि फॅटी अ‍ॅसिड आणि कार्बोहायड्रेटचे समीकरण योग्य राखते. इकोकार्डियोग्राफीकच्या अभ्यासानुसार धावणाऱ्या व्यक्तींचे हृदय हे न धावणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. तसंच हृदरोगापासून दूर राहाता येते.

हाडे आणि मांसपेशीच्या मजबूतीसाठी

हाडे आणि मांसपेशीच्या मजबूतीसाठी

शरीराच्या मजबूतीसाठी मांसपेशी आणि हाडांचे निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये येणारी कमतरता ही संपूर्ण शरीराला प्रभावित करते. आहारासह नियमित धावण्याचा मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीला फायदा मिळतो. एका अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, नियमित स्वरूपात धावणाऱ्या व्यक्तींची हाडे अत्यंत चांगली राहातात.

पोटाची चरबी विरघळवण्यासाठी

पोटाची चरबी विरघळवण्यासाठी

पोटाच्या चरबीची समस्या असेल तर तुम्ही धावण्याचा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटीमुळे पोटावरील चरबी गळण्यास मदत होते. अहवालानुसार रोज ३० ते ६० मिनिट्स धावण्याचा व्यायाम केल्याने पोटावरील चरबी विरघळून पोट सपाट होण्यास मदत मिळते.

[ad_2]

Related posts