[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हृदयरोगाचा धोका होतो कमी
हार्वर्डच्या मते, फळे आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका आणि त्यामुळे होणारा मृत्यू रोखला जाऊ शकतो. दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयरोग आणि मृत्यूचा धोका सुमारे 4% कमी होतो. हिरव्या पालेभाज्या जसे की लेट्युस, पालक, स्विस चार्ड आणि मोहरीची पाने हृदयविकाराचा धोका सर्वात कमी करतात.
(वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स)
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील
दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हार्वर्डने एका अभ्यासाचा दाखला देत म्हतले आहे की फळे आणि भाज्यांचे सेवन कमी रक्तदाब अर्थात लोअर्ड ब्लड प्रेशरशी संबंधित आहे. यासाठी ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स, संत्री, लिंबू आणि द्राक्षे इत्यादींचे सेवन करावे.
(वाचा :- सांध्यात चिकटलेलं युरिक अॅसिड या उपायांनी जातं वाफेसारखं उडून, मुतखडा व हाडांच्या आजारातून होते कायमची मुक्ती)
कॅन्सरचा धोका होईल कमी
हार्वर्डने एका अभ्यासाचा दाखला देत म्हटले आहे की पौगंडावस्थेमध्ये अधिक फळे आणि भाज्या खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 25% कमी होतो. पौगंडावस्थेमध्ये सफरचंद, केळी, द्राक्षे आणि कॉर्नचे अधिक सेवन करावे. ते ट्यूमरचा धोका देखील कमी करतात. पालेभाज्या, ब्रोकोली, बोक चॉय, कोबी, तसेच लसूण आणि कांदे, यांच्या सेवनाने तोंड, घसा, व्हॉइस बॉक्स, अन्ननलिका आणि पोट यासह अनेक प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते असे दिसून आले आहे.
(वाचा :- पोट साफ होण्यासाठी तासनतास बसता टॉयलेटमध्ये? जोर लावणं सोडा, मूळव्याध व आतड्यांतील घाण जाळून राख करतात हे 7 उपाय)
मधुमेहाचा धोका होतो कमी
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ब्लूबेरी, द्राक्षे आणि सफरचंद इत्यादी संपूर्ण फळांचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्यांचे सेवन मधुमेहाचा धोका कमी करण्याशी संबंधित असल्याचे आढळून आले.
(वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण)
वाढणार नाही लठ्ठपणा
तरुण मुलं-मुली म्हणजेच जे 24 वर्षांच्या आतील वयाचे आहेत आणि जास्त फळे आणि भाज्या खातात, त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कमी असते. बेरी, सफरचंद, नाशपाती, सोया आणि फुलकोबी हे वजन कमी करणारे चांगले पदार्थ आहेत.
(वाचा :- Diet Plan: वयाच्या 40 शीत भरभरून खा हे पदार्थ, डायबिटीज, कॅन्सर, बीपी राहतील 10 हात दूर, म्हातारपण येणारच नाही)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]