लघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh News :  वंदे भारत ट्रेनला (vande bharat express) देशभरात प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जलद आणि सुखकर प्रवास यामुळे प्रवासी वंदे भारत ट्रेन ट्रेनला प्राधान्य देत आहेत. मध्य प्रदेशात विचित्र प्रकार घडला आहे. भोपाळ रेल्वे स्थानकात एक प्रवाशी लघुशंका करण्यासाठी थेट वंदे भारत ट्रेनमध्ये चढला. तो टॉयलेटमधून बाहेर आल्यावर ट्रेनचे दरवाजे लॉक झाले होते. यामुळे हा व्यक्ती थेट भोपाळहून थेट 194 KM लांब असलेल्या उज्जैन रेल्वे स्थानकात पोहचला. या सगळ्या प्रकारात या व्यक्तीला सहा हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागला. अब्दुल कादिर (वय…

Read More

मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला “ज्याने चूक केली, त्याला शिक्षा…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन मध्य प्रदेश सरकारवर (Madhya radesh Government) सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं आहे की, ही घटना 2020 मधील आहे. त्यावेळी मी दुकानाबाहेर बसलो होते. तेव्हा आरोपी प्रवेश शुक्ला धुम्रपान करत माझ्याजवळ आला आणि माझ्यावर लघुशंका केली. त्यावेळी मी त्याचा चेहरा पाहू शकलो नव्हतो.  दशरम याने पुढे सांगितलं की, व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.…

Read More

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा…

Read More

आदिवासी मजूरावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; भाजपा कनेक्शन आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. या व्यक्तीवर कडक कारवाई करा अशी मागणी सोशल मीडियावरुन होऊ लागली होती. थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही या व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे.  सिधी जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना, व्हिडीओत…

Read More