..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर मंगळवारी एक फारच रंजक प्रकार घडला. सरन्यायाधिशांनी कोर्टाचं कामकाज सुरु असताना असं काही केलं की त्यांच्या कृतीने साऱ्यांचं मन जिंकलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना युक्तीवाद करत होते. मेहता यांचा युक्तीवाद सुरु असतानाच अचानक सरन्यायाधिशांनी त्यांना हटकलं. त्यांनी मेहता यांना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कनिष्ठ वकिलांबद्दल विचारलं. उभ्याने हे वकील सुनावणीला हजर असल्यावर सरन्यायाधिशांनी आक्षेप घेतला. सरन्यायाधीश एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या…

Read More

सुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : सर्वोच्च न्यायलयात मंगळवारी एका सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एका वकिलामध्ये मजेदार संवाद पाहायला मिळाला. सुनावणीदरम्यान या वकिलाने आधी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची माफी मागितली. त्यानंतर वकिलाने मी व्हिस्कीचा चाहता आहे अशी कबुली नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे दिली. यानंतर न्यायलयात एकच हास्यकल्लोळ उठला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि ज्येष्ठ वकिलातील या संवादाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. न्यायालयातील या हलक्याफुलक्या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सर्वोच्च न्यायालयात औद्योगिक अल्कोहोलचे नियमन करण्यासाठी कायदे करण्याच्या राज्यांच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणावर सुनावणी सुरू होती. या…

Read More

‘CBI सारख्या यंत्रणांनी…’, चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, ‘मागील काही वर्षांमध्ये..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On CBI: केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत. 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेतील आपल्या भाषणामध्ये न्या. चंद्रचूड यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.  सीबीआयने आपल्या भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं माझ्या मते मागील काही वर्षांमध्ये आपण आपल्या केंद्रीय…

Read More

Electoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.

Read More

Electoral Bonds: 'मला बोलण्यास भाग पाडू नका, नाहीतर..'; चंद्रचूड सुनावणीत स्पष्टच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डविरुद्ध दिलेला निकाल रद्द करण्यासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पत्रावरुन सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना कठोर शब्दांमध्ये सुनावलं.

Read More

‘माझ्यावर ओरडू नका!’ म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud Scolds Lawyer Video: भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान एका वकिलावर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. ‘माझ्यावर ओरडू नका,’ असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं. या संपूर्ण शाब्दिक बाचबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीश संतापले 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करावी यासंदर्भात दाखल करण्यात…

Read More

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय भूमिका घेणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. भाजपची एजंटगिरी “मोदी काळ हा राष्ट्र, संविधान, लोकशाहीसाठी अशुभ काळ आहे. सर्व घटनात्मक संस्थांवर भाजपने ‘आपली’…

Read More

…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घ्या 5 न्यायाधीशांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळेच लेखी निर्णयाखाली कोणत्याही न्यायाधिशांचं नाव लिहिलेलं नव्हतं अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.  काय निकाल…

Read More

‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, ते मला रात्री…’, महिला जजला हवंय इच्छामरण; थेट CJI चंद्रचूड Action मोडमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Judge Sexual Harassment Letter To CJI Chandrachud: उत्तर प्रदेशमधील सिव्हील कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर या महिला न्यायाधीशाने थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंतीही केली आहे. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या या महिला न्यायाधिशांच्या चिठ्ठीची दखल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी घेतली आहे. चंद्रचूड यांनी अलाहाबाद हायकोर्टाकडे या प्रकरणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रचूड यांनी घेतली दखल समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल अतुल एम. कुरहेकर…

Read More

‘आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला…’; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On Court Interference In Government Work: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात आपलं एक निरिक्षण नोंदवलं असू सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आहे. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. न्यायाव्यवस्था ही प्रगतशील सामजाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन यूनिव्हर्सिटी लॉ सेंटर आणि दिल्लीतील सोसायटी फॉर डेमोक्रेटिक राइट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. आम्ही जनतेमधून निवडून येत नाही पण… न्यायव्यवस्थेकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केलं. जरी…

Read More