पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर रिव्ह्यूड जर्नल जिओफिजिकलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या महासागराची निर्मीती होताना भौगोलिक घटनाक्रम नेमका कसा असेल याबाबत सविस्तर माहिती  जिओफिजिकल जर्नलमध्ये देण्यात आली आहे.…

Read More

SBIचा ग्राहकांना मोठा झटका; डेबिट कार्डसंबंधीत नवीन नियम जारी, 1 एप्रिलपासून लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sbi Debit Card News: स्टेट बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डसंबंधी नियमांत बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. 

Read More

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदींनीच केली घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “भारताच्या राष्ट्रपतींनी…

Read More

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा…

Read More

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old vs New Tax Regime In Marathi : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या कर रचनेत थोडाफार दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना जुन्या कर प्रणालीपेक्षा जास्त कर सवलत देण्यात आली आहे. भारताच्या आयकर कायद्यानुसार आयकर हा केवळ व्यक्तींवरच नाही तर कंपन्यांवरही आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच HUF तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेटसह उत्पन्नावर आयकर आकारला जातो. तसेच  जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होणारा आयकर दर प्रामुख्याने उत्पन्न आणि उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो. यामध्ये वय देखील विचारात घेतले जाते.…

Read More

Fake ID in girls name pornographic videos and blackmailing Robbed of 25 crores;मुलीच्या नावाने आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक  केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi  auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…

Read More

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, मार्चमध्ये इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission : सरकारी नोकरी म्हटलं की काही समीकरणं आपोआपच डोळ्यांसमोर येतात. यामध्ये मग नोकरीत मिळणारा पगार, सुट्ट्या, सुविधा यांची मांडणी होते आणि मग, ‘आपल्यालाही अशीच एखादी नोकरी हवीये…’ ही इच्छाही व्यक्त केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या साऱ्यामध्ये महत्त्वाची बाब असते ती म्हणजे पगार आणि पगारवाढ, सोबतच लागू होणारे वेतन आयोग.  केंद्राकडून सातत्यानं कर्मचाऱ्यांना प्राधान्यस्थानी ठेवत वेतन आयोगाच्या तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. यंदाच्या वर्षीसुद्धा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अशाच एका वेतन आयोगाचा फायदा मिळणार असून, यामुळं त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.  उपलब्ध माहितीनुसार…

Read More

RBI Guidelines : तुमच्या कामाची बातमी , तुमचे बँक खाते बंद असल्यास…, RBI कडून नवीन अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Guidelines News in Marathi : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरातील बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या ठेवींबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुमच्याकडे अशी खाती असतील, जी एकाच वेळी सुरु केली होती, पण ती खाती आता वापरली जात नाहीत, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असेल. कारण आरबीआयकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.  तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असेल आणि ते निष्क्रिय असेल म्हणजे बंद असेल तर अशा ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे…

Read More

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला जवळपास 97 लाख रुपयांची टिपदेखील मिळाली होती. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल  (Deepinder Goyal)ने अलीकडेच त्यांच्या ट्वीटमध्ये याचा खुलासा केला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read More